माजी खासदार
लोकनेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली १९९६ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाची १९ ऑक्टोबर १९९६ रोजी सरकार दप्तरी नोंद झाली. शिक्षण, आरोग्य, क्रीडा, संस्कृती आणि आपत्ती निवारण अशा क्षेत्रांत मंडळ गव्हाणपासून संपूर्ण रायगडात कार्यरत आहे.
२ ते १० जून २०१६ दरम्यान लोकनेत्यांच्या जन्मदिनी मंडळाने आयोजित केलेल्या अखंड भजन उपक्रमाची ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली.
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत वह्या, गणवेश व शालेय साहित्य. आजवर २०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ; शिष्यवृत्ती व शैक्षणिक मदतीसाठी दरवर्षी २० ते ३० लाखांहून अधिक निधी.
दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आणि औषधांचे वाटप.
२००६ पासून राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धा; २००९ पासून ‘राजीव गांधी सुवर्ण चषक’. महिला व पुरुष गटांना समान बक्षिसे.
रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन.
पनवेलमध्ये नाट्य महोत्सव आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने गेली १२ वर्षे भरणारी ‘अटल करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा.
२००६ पासून आगरी-कोळी संस्कृतीचा उत्सव; मल्हार महोत्सवाने पनवेल-रायगडात सांस्कृतिक वातावरण निर्माण केले.
२००० पासून जिल्हास्तरीय आणि २००४ पासून मुंबई मराठी पत्रकार संघासोबत भरघोस बक्षिसांची दिवाळी अंक स्पर्धा.
२००५ चा पनवेलचा महापूर, २०२० मधील कोरोना लॉकडाऊन आणि २०२१ मधील महाड पूरस्थितीत गरजूंना अन्नधान्य व मदत. कोरोना काळातील कार्याबद्दल ‘कोरोना देवदूत पुरस्कार’.
७ सप्टेंबर २०१७ रोजी नेत्रदान जनजागृती पंधरवड्यानिमित्त स्वतः नेत्रदानाचा संकल्प.
संदर्भ: ‘रामपर्व’ – विजय इंदूकेशव पवार (मे २०२६)